Team Khulasa

विरार: विरार वसई मध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. लोकसंख्या वाढीमुळे विरार मधील प्रत्येक परिसर हा विकसित होत गेला आहे. मोठमोठ्या इमारती, मोठमोठे रस्ते पालिकेने तयार केले आहेत.
शाळा, कॉलेज आणि वर्दळीच्या ठिकाणी अपघात, ट्रॅफिक होऊ नये याकरिता पालिकेने विरार मध्ये वेगवेगळ्या जागी सिग्नल यंत्रणा कार्यरत केली आहे. मात्र वाहन चालकांना सिग्नल च्या नियमांविषयी काहीच माहिती नसल्याचे दिसते. वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे व सोयीचे जावे याकरिता सिग्नल च्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असते. मात्र, झेब्रा क्रॉसिंग काय आहे? हेच वाहन चालकांना माहित नसल्याचे दिसून येते.
सिग्नल लाल झाल्यावर झेब्रा क्रॉसिंग च्या मागे गाड्या थांबवायच्या असतात व झेब्रा क्रॉसिंग वरून नागरिकांनी रस्ता ओलांडायचा असतो. मात्र ह्याचे ज्ञानच कोणालाही नसल्यामुळे वाहन चालक सिग्नल लागल्यावर गाडी झेब्रा क्रॉसिंग च्या मागे न थांबवता झेब्रा क्रॉसिंग वर थांबवत असल्याचे समोर आले आहे.