Team Khulasa

मालाड: कधी-कधी शेजाऱ्यांचा त्रास नको म्हणून आपण खिडकी बंद करतो परंतु मालाड येथील मालवणी मध्ये हि उघडलेली खिडकीच महिलेच्या बचावाचे कारण ठरली. मालवणीमध्ये दिवसा ढवळ्या एका महिलेचा तिच्याच राहत्या घरात घुसून बळजबरी केला असल्याची घटना समोर आली आहे. नशेत धुंद असणारा आरोपी हा महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करू लागला परंतु या घराच्या खडकीमुळे महिलेची अब्रु वाचवण्यास मदत झाली. हा सर्व प्रकार cctv क्यामेरयात कैद झाला आहे.
आरोपी विशाल हा मिरारोड येथील रहिवाशी असून तो मालवणी येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राकडे आला होता. आणी एक दिवस आधिच या घटनेचा प्लान केला गेला असल्याचे पिडीत महिलेच्या पतीने सांगितले. यात आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेची लोकांनी पोलिसांना तक्रार केल्यानंतर मालवणी पोलिस ४५ मिनिटांनी आले तर खरे परंतु आरोपीला पकडण्यासाठी नव्हे तर आरोपीस सोडवण्यासाठी असा देखील तेथील लोकांनी आरोप केला आहे. यानंतर मालवणी पोलिस तेथील रहिवाश्यांच्या सांगण्यावरून आरोपीस पोलिस ठाण्यात घेऊन तर गेली परंतु त्याला बाहेर बसवुन पिडीतेची तक्रार नोंदवायला आत गेली असता आरोपी रिक्षा पकडुन फरार झाला आणि पोलिस फक्त बघत राहिले. अत्तापर्यंत पोलिसांनी या घटनेची फक्त तक्रार नोंदवली आहे. तर पोलिसांनी आरोपीस अटक करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी पिडीत महिलेची मागणी आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार पाहता एवढेच म्हणता येईल कि एकाठिकाणी मुंबई पोलिस ऑनलाईन तक्रारीसाठी ट्वीटरवर अकाउंट सुरु करत आहेत. तर दुसरीकडे स्वताच अशा नाराधमांसाठी रान मोकळे करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. संपुर्ण बातमी जाणुन घेण्यासाठी पहा या बातमीचा वरील व्हिडीओ.

Reporter – Raja Mayal

Voice Over – Priyanka Shrikant Sudrik